पोटचा मुलगाचं निघाला वैरी! जन्मदात्या वडिलांची फाशी देऊन हत्या करत केला आत्महत्येचा बनाव विनोद जिरे
महाराष्ट्र

पोटचा मुलगाचं निघाला वैरी! जन्मदात्या वडिलांची फाशी देऊन हत्या करत केला आत्महत्येचा बनाव

इंजीनियरिंग शिकणाऱ्या मुलाच्या क्रूर कृत्याने परळीत खळबळ

विनोद जिरे

बीड : धनंजय मुंडे यांच्या परळीत अतिशय धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाला फाशी देऊन हत्या केली आणि आत्महत्येचा बनाव केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालावरून संशय आल्याने, पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी, चौकसपनातून या हत्येचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी इंजीनियरिंग शिकणाऱ्या नराधम आरोपी मुलाला अटक केली आहे.

हे देखील पहा-

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी आहे, की दिनांक 11 नोव्हेंबर दिवशी माहिती देण्यात आली की, शहरातील विद्यानगर भागात राहणाऱ्या, अजय शांतीलाल लुंकड या प्लॉट व्यावसायिकाने, आजार पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनतर आरोपी मुलाचे संशयास्पद वर्तन आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या जोरावर, पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.

पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली असून, या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. वडिलांचे माझ्यावर प्रेम नव्हत म्ह्णून हत्या केल्याचे, आरोपी सिद्धार्थ अजय लुंकड या मुलाने सांगितले आहे. हत्येच्या ७ दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे.

दरम्यान तीन क्विंटल गांजा सापडल्यानंतर, 140 गाढवांची चोरी, त्यानंतर सपनाचा डान्स आणि आता चक्क पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची क्रूरपणे हत्या केल्याने, परळीत मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या परळीत चाललंय तरी काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

SCROLL FOR NEXT