Nanded Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Nanded Civil Hospital : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; लहान मुलांच्या आयसीयू वार्डात झुरळ, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Nanded News :नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड वर्षांपूर्वी अचानक २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे नांदेडचे शासकीय रुग्णालय देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचा प्रश्न कायम पाहण्यास मिळत असतो. अशातच नांदेड शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील लहान मुलांच्या आयसीसीयू वार्डात झुरळ असल्याचे दिसून आले आहे. या अशा प्रकारामुळे मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड वर्षांपूर्वी अचानक २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे नांदेडचे शासकीय रुग्णालय देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर प्रशासकीय व्यवस्था स्थापन करून काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र आता शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. 

झुरळ व डासांचाही त्रास 

मुळात लहान मुलांच्या वार्डात अधिक सुरक्षा व स्वच्छता असणे आवश्यक आहे. मात्र नांदेडच्या डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या आयसीयु वार्डमध्ये झूरळ आणि डास नवजात अर्भाकाभोवती फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यामुळे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. 

डिनचा बोलण्यास नकार 

सदरील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या नंतर रुग्णालय प्रशासनाने प्रेसनोट काढली आहे. शासकीय रुग्णालयातील व्हायरल विडियो याप्रकरणी एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यात येत असून दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा उल्लेख प्रेसनोट मध्ये करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयातील व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT