Shivraj rakshe : पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला पराभूत केले आहे. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरताच त्याच्या गावी ग्रामस्थांनी जल्लोष केला. त्यावेळी शिवराजच्या कुटुंबीतील सदस्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. (Latest Marathi News)
महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेची अंतिम लढत शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) विरुद्ध महेंद्र गायकवाड लढत झाली. या लढतीत अवघ्या काही सेंकदात शिवराजने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली. महाराष्ट्र केसरी जिंकल्याने शिवराजला मानाची चांदीची गदा आणि ५ लाख रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर महिंद्र थारही एसयुव्ही देखील मिळणार आहे.
यासोबतच आता शिवराजला सरकारतर्फे आणखी एक मोठं बक्षिस मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तशी घोषणा केली आहे. शिवराजला शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट
मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चितपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरीत नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.