उद्धवजींनी शिवसैनिकांना थांबवायला पाहिजे होते- बावनकुळे जयेश गावंडे
महाराष्ट्र

उद्धवजींनी शिवसैनिकांना थांबवायला पाहिजे होते- बावनकुळे

केंद्रीय मंत्री यांना नारायण राणे अटक झाल्यानंतर भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया घेतली असता. त्यावेळी ते म्हणाले आहे

अॅड. जयेश गावंडे

अकोला : केंद्रीय मंत्री यांना नारायण राणे अटक झाल्यानंतर भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया घेतली असता. त्यावेळी ते म्हणाले आहे की, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे हा नियम आहे. ती नियमाने होईल. परंतु, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे नियमांच्या बाहेर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

नियमबाह्य गुन्हे आहेत. अदखलपात्र गुन्ह्यांना दखलपात्र केले असल्याचा, आरोप भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अकोल्यातील खोलेश्वर या ठिकाणी भाजयुमोच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले असता ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, यापूर्वी या राज्यात मागच्या २ वर्षांपासून ५० उदाहरण देता येईल की, शिवसेना आणि त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून यापूर्वी शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांना अश्लील भाषेत वक्तव्य झाले आहेत. भाजपने कधीही यासंदर्भात राजकिय उत्तरे दिली आहेत. जाळपोळ केली नाही.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले आहेत. राज्यात जाणीवपूर्वक वातावरण खराब करणे किंवा बंगाल सारख वातावरण करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शांतपणे ही मार्ग निघू शकतात. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अमरावती भाजप कार्यालयात झालेल्या जाळपोळी बाबत ते म्हणाले, अमरावती भाजप कार्यालयात कोणी नसताना तिथे जाळपोळ करण्यात आली आहे.

यानिमित्ताने राज्यातील सर्वच कार्यालयाचे सरंक्षण करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात अमरावती एसपी यांना भेटून याबाबत गुन्हे दाखल करण्याची विनंती करू. आम्हाला अपेक्षा ही होती की उद्धवजी यांनी याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अपील करून, त्यांना थांबवायला पाहिजे होते, असेही भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

SCROLL FOR NEXT