devendra fadnavis uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

फडणवीसांची खुली ऑफर, ठाकरेंकडून प्रतिसाद मिळणार का? शिवसेना खासदाराची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MP Sanjay Raut : फडणवीसांच्या ऑफरवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया, ड्युप्लिकेट शिवसेना-राष्ट्रवादीवर जोरदार टीका, ठाकरे यांना मिळणार का प्रतिसाद यावर चर्चेला उधाण.

Namdeo Kumbhar

Fadnavis Offers Alliance to Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळा अध्याय पाहायला मिळणार का? अशी चर्चा सुरू होती, पण त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी स्पष्टच मत मांडले. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरकडे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. त्याशिवाय ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये आले, त्यावरही त्यांनी टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटईत आहेत. त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा, टिचकी मारली असेल असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देत आहे आणि आम्हाला खात्री आहे न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर ड्युपलिकेट लोक बसलेले आहेत. आपल्याबरोबर ड्युपलिकेट ठेवायचे की असली ठेवायचे, हे फडणवीसांनी ठरवावे, असेही राऊत म्हणाले.

सध्या तरी त्यांचा कारभार ड्युपलिकेट लोकांना घेऊन चालला आहे. ड्युपलिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, ड्युपलिकेट शिवसेना त्यांच्यामुळे शिवसेनेचे जे चाललं आहे ते उत्तम चालले आहे. फडणवीस यांची ऑफर याला मी ऑफर म्हणत नाही, आपल्या टपल्या टिचक्या म्हणतो, अजिबात गांभीर्याने घेत नाही, असे राऊत म्हणाले.

सध्या देवेंद्र फडणवीस हे ड्युपलिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहेत. डुप्लिकेट शिवसेना ड्युपलिकेट राष्ट्रवादी त्यांना कोणता वैचारिक आधार नाही, असा असताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याचे ऑफर देत आहात ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असा टोला फडणवीस यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update: अंगारकी चतुर्थीनिमित्त अथर्वशीर्ष पठण आरती

SCROLL FOR NEXT