CM Eknath Shinde, Raju Shetti, kolhapur Saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News : मुख्यमंत्र्यांचा आज कोल्हापूर दाैरा : राजू शेट्टींना एकनाथ शिंदेंचा फाेन, दोघांत झाली महत्त्वपूर्ण चर्चा

दाेन दिवसांसाठी आंदाेलन स्थगित करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Raju Shetti News : राज्य शासनाच्या वतीने आज (मंगळवार) शासन आपल्या दारी हा उपक्रम कोल्हापुरात (kolhapur) आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana president raju shetti) हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाब विचारणार होते.  (Maharashtra News)

मात्र राजू शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात काल (साेमवार) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनीवरून राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली. येत्या १५ जूनला दुपारी ३.०० वाजता सह्याद्री अतिथीग्रह येथे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक लावली आहे असे सांगितले.

त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणारे काेल्हापूरातील आंदोलन आगामी दाेन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. या मुद्याबाबत जर १५ जूनच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर येथून पुढे राज्यातील होणारे “शासन आपल्या दारी “या उपक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कार्यकर्ते उपस्थित राहून सरकारला याचा जाब विचारतील असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT