CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभे राहणार! CM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा; चौकशीचेही दिले आदेश

Keshavrao Bhosale Natyagruha Kolhapur : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने २० कोटी निधी देण्याची घोषणा केली आहे. विम्याचे 5 कोटी असे 25 कोटी रुपये देऊन पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा आणि अनेक कलाकार घडवलेलं केशवराव भोसले नाट्यगृह दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झालं. कित्येक पिढ्यांच्या कितीतरी आठवणी, भावना जळून खाक झाल्या आहेत. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण जिल्हा आणि कलाकार हळहळले होते. मात्र आता हे नाट्यगृह पु्न्हा उभे राहणार आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने २० कोटी निधी देण्याची घोषणा केली आहे. विम्याचे 5 कोटी असे 25 कोटी रुपये देऊन पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरला भेट दिली. यावेळी घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. तसंच या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.आमचं सरकार हे सर्वसामान्य जनता कलाकार यांचा विचार करणारं सरकार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं ज्या पद्धतीचं बांधकाम होतं. त्याचं त्याच पद्धतीचं बांधकाम होईल, यासाठी तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे.केशवराव भोसले नाट्यगृहासोबत कोल्हापूरकरांच्या आणि कलाकारांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करून केशवराव भोसले नाट्यगृहाची त्वरित पुनर्बांधणी व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT