Chandrayaan-3 Launch Today Saam TV
महाराष्ट्र

Chandrayaan 3: भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप; मुख्यमंत्री शिंदेंनी केलं वैज्ञानिकांचं अभिनंदन

Chandrayaan 3: ‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath Shinde News: ‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे.

या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, 'चांद्रयान-३' ने यशस्वीरित्या झेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. 'चांद्रयान-३'ने यशस्वीरित्या झेप घेतल्यानंतर फडणवीसांना इस्रोचेही अभिनंदन केले.

'चांद्रयान-३' मोहिमेची धुरा कोणी सांभाळली?

भारताची तिसरी चंद्र मोहीम 'चांद्रयान-3' ने यशस्वीरित्या झेप घेतली आहे. 'चांद्रयान-3' या मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यासाठी इस्रोच्या टीममध्ये महिला शास्त्रज्ञ रितू करिधाल यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. महिला शास्त्रज्ञ रितू करिधाल यांच्यावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT