Ashadi Ekadashi 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Ashadi Ekadashi 2023: आषाढीच्या महापूजेचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं

आषाढीच्या महापूजेचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं

साम टिव्ही ब्युरो

Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वीकारले. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीच्या सदस्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी यात्रेच्या महापूजेचे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा वीणा आणि विठ्ठलाची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशी येत्या 29 जून रोजी साजरी होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.

एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाले आहे. गतवर्षी राज्यात अचानक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना विठुरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता.  (Latest Marathi News)

आषाढी यात्रा काळात उष्माघात टाळण्यासाठी पहिल्यांदाच पंढरपुरात स्प्रिंकलरचा कलरचा वापर

दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीला सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या दरम्यान भाविकांना उष्माघाताचा त्रास होवू नये यासाठी वारी काळात शहरात विविध ठिकाणी पाण्याचे फवारे बसविण्यात येणार आहेत. अशा प्रकारे फवारे पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहेत.

यंदा उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. यामध्ये यात्रा काळातील सोयी सुविधांवर चर्चा झाली. यामध्ये उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेवून गर्दीच्या ठिकाणी स्प्रींकलर (पाण्याचे फवारे) बसविण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार निवृत कर्नल सुपानीकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

SCROLL FOR NEXT