Devendra Fadnavis on Delhi rumours  Saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? मुख्यमंत्र्यांनी २ शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Delhi rumours : केंद्रीय मंत्रिपदासाठी दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन शब्दांत पूर्णविराम दिला. 'मी महाराष्ट्रातच आहे' असे स्पष्ट करत त्यांनी ठाकरे बंधूंच्या सभेवरही प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून केंद्रात मंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही फडणवीसांच्या दिल्ली वारीवर तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, या सर्व चर्चांवर आणि अफवांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच अवघ्या दोन शब्दांत पूर्णविराम लावला आहे.

दिल्लीत जाणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भाषेत म्हणाले, "मी महाराष्ट्रातच आहे!" मी आज नागपूरला आहे, संध्याकाळी मुंबई जाणार आहे, मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रामध्येच आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्री कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. याच वेळी शिवाजी पार्कातील ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) विजयी सभेवर टोला लगावताना फडणवीस म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधूंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, याचा मला आनंद आहे."

ठाकरे बंधूंच्या सेलिब्रेशनवर टीका

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी काहीतरी कारण मिळाले, याचा मला आनंद आहे आणि आम्हीही आनंदी आहोत.

हे प्रश्न कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून संपूर्ण तरुणाईला भेडसावणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दाखवून देशाच्या हिताचे सर्व आवश्यक निर्णय घेतले आहेत. तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी लोकसभेत एक असा कठोर कायदा आणला जात आहे, जो देश आणि जगाच्या इतिहासात कुठेही झालेला नाही. यासाठी त्यांनी मोदींचे आभार मानले.

उद्धव ठाकरेंच्या डायलॉगबाजीवर टोला

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचे डायलॉग उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षांपासून मारत आहेत, पण त्यांच्या डायलॉगचा कोणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण देश मोदीजींच्या पाठीशी आहे. पंतप्रधान मोदींनी रात्री १ वाजता पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने इन्स्टाग्रामचे जगातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, यावरूनच देश कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Death News : ८ वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT