मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  साम टीव्ही
महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीतील 130 कोटी पैकी 31 कोटी खर्च, 99 कोटी शिल्लक

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी (Cm relief fund) हा प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा 130 कोटी पैकी फक्त 31 कोटी खर्च करण्यात आली असून 99 कोटी रक्कम शिल्लक असल्याची आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

◆ प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य

◆ वैद्यकीय कारणांसाठी 22 महिन्यात 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित

◆ नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून आजमितीस 130 कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

वैद्यकीय कारणांसाठी 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून 99 कोटी रुपये शिल्लक आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 33 प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT