sindkhed raja rajwada saam tv
महाराष्ट्र

Sindkhed Raja Rajwada: राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

राजवाड्यांच्या भिंतीची व कमानींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे.

संजय जाधव

Buldhana News :

येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव (rajmata jijau jayanti) सिंदखेडराजा (sindkhed raja) येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात (sindkhed raja rajwada) संपन्न होणार आहे. मात्र जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पूर्ती दुरावस्था झाली आहे. येत्या 10 जानेवारी पर्यंत राजवाड्याची सुधारणा करावी अशी मागणी जिजाऊ भक्तांनी केली आहे.(Maharashtra News)

दरवर्षी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा केला जातो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या देखरेखी खाली आहे. मात्र या राजवाड्याची पुरती दुरावस्था झाली आहे. राजवाड्याच्या परिसरात पावसाळ्यात उगवलेले गवत व घाणीचे साम्राज्य आहे तर परिसरातील स्वच्छतागृहाची ही फार मोठी दुरावस्था झाली आहे. राजवाड्यांच्या भिंतीची व कमानींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे.

जिजाऊंचा जन्मोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपलेला असतानाही केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे या राजवाडा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येत्या 12 जानेवारीला देशभरातून लाखो जिजाऊ भक्त हे सिंदखेडराजा येथे येत असतात.

पुरातत्व विभाग याबाबतीत गंभीर नसल्याने आता जिजाऊ भक्त आणि राजे लखोजी जाधव यांचे वंशज आक्रोशीत झाले आहेत. येत्या 10 जानेवारी पर्यंत राजवाड्याची दुरुस्ती केली नाही तर या ठिकाणी मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT