CJP founder Abhijit Dipake addressing media, announcing ‘Kya Bolti Public’ nationwide campaign after Jantar Mantar protest success. saam tv
महाराष्ट्र

क्या बोलती पब्लिक? CJP ची देशवासियांना नवी साद, जंतरमंतरनंतर सीजेपीची जनसंवाद मोहीम

CJP Kya Bolti Public Campaign Details And Strategy: जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीचा पुढचा प्लॅन ठरलाय... सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा केलीये. आजवर मोठमोठ्या जनआंदोलनांनी देशाच्या सत्ताकारणात उलथापालथ केलीये. त्यामुळे सीजेपीची पुढची रणनीती नेमकी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

नीट पेपरफुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं आता देशवासियांशी संवाद साधण्यासाठी नव्या कॅम्पेनची घोषणा केलीय. क्या बोलती पब्लिक? या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी मैदानात उतरणार आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी थेट ठिकठिकाणी जाऊन देशवासियांशी संवाद साधणारेय.

कोणते मुद्दे घेऊन हे क्या बोलती पब्लिक अभियान राबवण्यात येणार आहे ते पाहूयात...

सीजेपीचं आता क्या बोलती पब्लिक?

सप्टेंबरपासून 'क्या बोलती पब्लिक?' या नावाने देशव्यापी अभियान

देशातील शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर जनतेशी संवाद साधणार.

CJP ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारी संघटना असेल.

यापूर्वी देशभरात जनसंवादाचं अभियान राबवण्यात आलं त्या त्या वेळी पक्ष आणि संघटनांना यश आलंय. त्यामुळे अभिजित दिपकेंची ही नवी रयत रणनिती सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी ठरु शकते का याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वीच्या अशाच जनसंवाद यात्रांवर एक नजर टाकूया....

देशभर मोहीम, यशाची हमी?

रथ यात्रा- 1990

यात्रेपूर्वी यात्रेनंतर

85 खासदार 120 खासदार

अडवाणींनी रथ यात्रा काढण्यापुर्वी भाजपकडे 85 खासदार होते यात्रेनंतर झालेल्या निवडणूकीत 120 खासदार निवडून आले

महाराष्ट्रातील संघर्ष यात्रा - 1994

यात्रेपूर्वी यात्रे नंतर

सेना+भाजप 94 सेना+भाजप 138

गोपीनाथ मुंडेंनी राज्यात कॉग्रेस सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढली त्यानंतर सेनाभाजप युतीचं संख्याबळ 94 वरून थेट 138 झालं आणि सेना भाजपचं सरकार सत्तेत आलं

चाय पे चर्चा - 2014

कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमानंतर

116 282

नरेंद्र मोदींनी हा कार्यक्रम घेतला आणि 116 खासदारांचे संख्याबळ असलेली भाजप 282 जागांवर विजयी झाली आणि सत्तेत आली.

भारत जोडो यात्रा - 2022

यात्रेपूर्वी यात्रेनंतर

52 खासदार 99 खासदार

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढण्यापुर्वी कॉग्रेसकडे 52 खासदार होते यात्रेनंतर झालेल्या निवडणूकीत 99 खासदार निवडून आले

इतिहासाचे हेच दाखले समोर ठेवत अभिजित दिपकेंनी CJPचा मास्टरप्लॅन आखलाय. आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर पक्ष स्थापन करण्याची घाई न करता अगदी सावध पवित्रा घेत क्या बोलती पब्लिकच्या माध्यमातून थेट लोकभावनेला दिपके हात घालणारेत. आज जरी हा केवळ एक दबावगट असला, तरी देशभरातील या संवादातून मिळणारा जनाधार भविष्यात कॉक्रोच जनता पार्टीला ज्या संसदेच्या पायऱ्या चढण्यापासून रोखलं गेलं, त्याच संसदेत नेऊन बसवणार का? याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Health: अक्रोड की बदाम? मेंदू अधिक तल्लख होण्यासाठी काय खावे?

Maharashtra News Live Update: टकरेखेडा येथे पती-पत्नीची दोन मुलींसकट रेल्वेखाली आत्महत्या

Ladki Bahin Yojana : ₹1500 की ₹3000? रक्षबांधनाआधी लाडकीच्या खात्यावर हफ्ता जमा, बँक बॅलन्स आताच चेक करा

Dangerous Fort : उभ्या कातळ पायऱ्या अन् दोन्ही बाजूंना खोल दरी! 'या' किल्ल्याची चढाई पाहूनच उडेल धडकी

Tharala Tar Mag : गरोदर सायली बनली लेडी सिंघम, अर्जुनसोबत सिक्रेट मिशनला सुरुवात, 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट | VIDEO

SCROLL FOR NEXT