CJP founder Abhijit Dipke faces fresh scrutiny as RTI activist demands probe into his family’s assets after NEET protest success. saam tv
महाराष्ट्र

दिपकेच्या वडिलांची संपत्ती तपासा, कायदेशीर संरक्षण निधी विरोधात तक्रार

Foreign Funding Row Deepens: नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सीजेपीसमोर नवं आव्हान उभं राहिलंय. सीजेपीला परदेशी निधी पुरवण्यात आल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येतेय. आता या प्रकरणात सूरतस्थित RTI कार्यकर्त्यानं थेट दिपके कुटुंबालाही ओढलंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

नीट पेपरफुटी आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. दिपकेचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीये. ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी आहे. सूरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी या संदर्भात निवडणूक आयोग आणि कर अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीये.

दुसरीकडे जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीला मिळणाऱ्या विदेशी देणग्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरम्यान, साम टिव्हीच्या BLACK AND WHITE या विशेष कार्यक्रमात अभिजीत दिपकेंनी आपल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलंय..

सूरतस्थित आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर 'कॉक्रोच जनता पार्टी'समोर नवं आव्हान निर्माण झालंय. निधीच्या मुद्यावरुन सरकार दीपकेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणार का? आणि अभिजीत दीपके त्याला कसं सामोरं जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT