Pandharpur Corridor, pandharpur saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Corridor : एकच जिद्द कॉरिडॉर रद्द; पंढरपूरात महामाेर्चा

पंढरपूरचा विकास निश्चित करा, पण घरादाराला हात लावू नका अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भारत नागणे

Pandharpur Corridor : पंढरपूर शहरात आज मुक माेर्चाच्या माध्यमातून पंढरपूरच्या कॉरिडॉरला स्थानिकांनी विरोध दर्शविला. या माेर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले हाेते. विठ्ठल मंदिर परिसरातील आरक्षित असलेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा रद्द करा या मागणीसाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी हा माेर्चा पालिकेवर काढला. (Pandharpur Latest Marathi News)

पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचे निश्चित केले आहे. मात्र या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणामार्गाच्या आतील सुमारे पाचशेहून अधिकची घरे भूसंपादित होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी (सन 1982 पासून) दोन वेळा पंढरपुरात (pandharpur) रस्ता रुंदीकरणासाठी याच परिसरातील लोकांचे भूसंपादन झाले. आता पुन्हा एकदा सलग तिसऱ्या वेळी मंदिर परिसरातील लोकांच्या घरांवर नांगर फिरवण्याचा घाट सरकार (maharashtra government) घालत आहे.

या विरोधात आज (गुरुवार) मंदिर परिसर व प्रदक्षणा मार्गाच्या आतील महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन प्रशासनास मुक मोर्च्याद्वारे निवेदन देत कॉरिडॉरला विरोध केला. या मोर्चात (morcha) सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. पंढरपूरचा विकास निश्चित करा, पण घरादाराला हात लावू नका. पर्यायी शासकीय जागांचा वापर करून वारकरी भक्तांसाठी सुविधा निर्माण करा अशी मागणी स्थानिक नागरिक व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे‌. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT