Navi Mumbai Saam TV
महाराष्ट्र

स्मार्ट सिटीमधील नागरिकांना वापरावे लागतंय शौचालयातील टाकीचे पाणी

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाचे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरणही आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये मागील 2 ते 3 महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे झोपडपट्टी मधील नागरिक चक्क मनपाच्या शौचालयाला असलेल्या नळातून पाणी भरत आहेत. नवी मुंबई (Navi Mumbai) 21 व्या शतकातील स्मार्ट सिटी, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाचे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरणही आहे. मात्र आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की याच स्मार्ट सिटी मधील तुर्भे झोपडपट्टी मध्ये चक्क शौचालयातील पाणी वापरण्याची वेळ येथील काही नागरिकांवर आली आहे.

शहराच्या एक बाजूस संपूर्ण शहर वसलंय तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसी याच तुर्भे एमआयडीसी मधील हे भयंकर वास्तव समोर आलं आहे. 6 महिन्यांपासून या झोपडपट्टीला पाणी पुरवठा होत नसल्याने चक्क शौचालयावर लावण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी भराव लागत आहे. हे पाणी देखील सहज मिळत नसून यासाठी देखील नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. 21व्या शतकातील स्मार्ट शहरात नागरिकांना शौचालयातील पाण्याच्या टाकीतील पाणी प्यावे लागत असेल तर स्वच्छतेत मिळणारी जागतिक नामांकन काय कामाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT