वाघाला मारण्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत नागरिकांचे ढोल बजाओ आंदोलन! संजय तुमराम
महाराष्ट्र

वाघाला मारण्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत नागरिकांचे ढोल बजाओ आंदोलन!

वाघाला तातडीने ठार मारा व वन अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) शहरालगतच्या तीन वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी आज वनविभाग मुख्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करीत जोरदार निदर्शने केली. जवळपास दोन वर्षापासून तीन वनपरिक्षेत्रात वाघाने (Tiger) धुमाकूळ घातला असून याजपर्यंत या वाघाच्या हल्ल्यात 14 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. (Citizens agitation in Gadchiroli demanding killing of tiger)

हे देखील पहा-

या वाघाच्या दहशती विरोधात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन- जेल भरो टाळेबंदी आंदोलन करून देखील वनविभाग (Forest Department) सुस्त आहे. 3 सप्टेंबर रोजी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश पहिल्यांदा दिले; मात्र त्यानंतरही या वाघाला विविध पथकांच्या नेमणुकीनंतर जेरबंद करण्यात अपयश आले आहे. वाघाच्या दहशतीमुळे सुमारे वीस गावातील नागरिकांच्या दैनंदिनीवर थेट परिणाम बघायला मिळत असून, शेतशिवारातील कामे ठप्प झाली आहेत. वाघाच्या दहशतीने विद्यार्थी शाळेपासून (School) मुकले आहेत.

वाघ पकडला जात नसल्याने वनविभागाच्या संथगती विरोधात नागरिकांनी आज गडचिरोलीच्या रस्त्यावरून ढोल बजाव मोर्चा काढला. स्थानिक वनविभाग मुख्यालयासमोर मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर (Kishor Mankar) यांनी मोर्चेक-यांना सामोरे जात वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. वाघाला तातडीने ठार मारा व वन अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आंदोलकांनी पुढे रेटली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT