Chor Ganpati Sangli विजय पाटील
महाराष्ट्र

Chor Ganpati: नवसाला पावणाऱ्या सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना; सर्वधर्मीयांचे आहे श्रद्धास्थान

150 Years Old Traditional Chor Ganpati - Sangli | कोणालाही माहिती न पडू देता गणेशाची स्थापना होते.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून अनेकांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील (Sangli Chor Ganpati) प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. मात्र कोरोनाच्या या महामारीमुळे दोन वर्षांनंतर अतिशय उत्साहात चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. (Chor Ganpati Sangli News)

हे देखील पाहा -

गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडू देता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्येही गेल्या दोनशे वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली गेली आहे. तर हा गणपती दीड दिवसांसाठी बसवला जातो. या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तर जतन केले जाते. या मूर्तीला सुखरुप ठिकाणी ठेवले जाते.

या गणपतीबरोबरच गणेश चतुर्थीला (Ganeshotsav 2022) नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील हजारो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्मग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र कोरोनाच्या काळात गेले दोन वर्षे झाले कोणतेही धार्मिक कार्यक्रम झाले नव्हते. यंदा मात्र दोन वर्षानंतर उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'कॉकरोज जनता पार्टी'ला आणखी एका धक्का; 1000000 सदस्य असलेल्या पक्षाची अधिकृत वेबसाइट बंद

Weight Loss: जीरा वॉटर की चिया सिड्स? वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन ठरेल बेस्ट?

New Mumbai- Pune Expressway: गुड न्यूज! मुंबईवरुन पुण्याला पोहचा फक्त ९० मिनिटांत, तयार होतोय नवा ८ पदरी 'एक्स्प्रेस वे'

Face Care: महागड्या फेशियलची काय गरज? घरच्या घरीच 'हा' फेसमास्क लावून मिळवा गुलाबी मुलायम त्वचा

डब्यांवर तेलकट, पिवळे डाग एका मिनिटात होतील गायब! वापरा हे भन्नाट उपाय

SCROLL FOR NEXT