आम्हाला वाचवा,आमची मदत करा; पुरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो Saam tv
महाराष्ट्र

आम्हाला वाचवा,आमची मदत करा; पुरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो

आम्ही सरकारकडे पुन्हा कधीही भीक मागणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) चिपळून (Chiplun Visit) दौऱ्यावर असून त्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करत तेथील नागरिकांशी संवाद साधला. चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांची विचारपूसही केली. यावेळी हतबल नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. (The flood victims demanded help from the Chief Minister.)

गेल्या आठवडयात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणचे प्रचंड नुकसान झाले आहे. चिपळूनमध्ये पोहचताच त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्यासमोरच टाहो फोडला. पुरामुळे आमचे खुप नुकसान झाले आहे. आम्हाला मदत करा, आम्हाला वाचवा, यावेळी आम्हाला उभं करा, आम्ही सरकारकडे पुन्हा कधीही भीक मागणार नाही. अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपले दुख व्यक्त केले. याशिवाय सरकारने आपल्याला कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही यावेळी तेथील व्यावसायिकांनी केली.

तर मुख्यमंत्र्यांनी नारगरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूनमधील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात कोकणातील मडाड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला. ज्यामुळे कोकण वासियांचे अतोनात नुकसान झाले. रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण बेपत्ता आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे कुंभारवाडीतही दरड कोसळल्याने घरे जमीनदोस्त झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. दरडी कोसळल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३ आणि रायगडमध्ये ५३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरु असून रायगड जिल्ह्यात अद्याप ४३ आणि रत्नागिरीत १७ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान कोकणात १६ जुलैपासून अतिवृष्टीमुळे १२५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५६ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. पुरामध्ये असलेल्या ६४ नागरिकांचा शोध सुरू आहे. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT