Chili Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Chili Price Hike: यंदा मिरची रडवणार, नागपुरात उत्पादन घटल्यानं भाव दुप्पट

यंदा नागपूर (Nagpur) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि रोगामुळे मिरचीचं उत्पादन घटलंय.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Chili Price Hike: नागपूर: यंदा नागपूर (Nagpur) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि रोगामुळे मिरचीचं उत्पादन घटलंय. त्यामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची (Chilli) आवक घटलीये. याचा परिणाम भावावर झाला असून भाव दुप्पट झालाय ().

कळमना मार्केटमध्ये दरवर्षी 20 ते 25 हजार पोते मिरचीची (Chili) आवक होते. मात्र, यंदा फक्त 5 हजार पोतीचं आवक झालीये. त्यामुळे भाव (Rate) 200 रुपये किलोवर पोहोचलाय. भाव आणखी वाढेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करताहेत. त्यामुळे मिरची ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार असं दिसतंय.

नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट

दुसरीकडे, आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये लूट होत असल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने 6300 रुपये प्रति क्विंटल तुरीचा हमीभाव ठरवून दिलाय. मात्र, नागपूर (Nagpur) कळमना मार्केटमध्ये 5100 रुपये प्रति क्विंटल दरापासून तुरीची खरेदी सुरु आहे. म्हणजे एका क्विंटलमागे शेतकऱ्यांची (Farmers) 1200 रुपये लूट सुरु आहे. एकीकडे शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा मात्र गप्प आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं; महिला आरक्षण विधेयकावरून CM फडणवीसांचा हल्लाबोल

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Maharashtra News Live Update: खोपोलीच्या डम्पिंग ग्राऊंडला महिन्याभरात तिसऱ्यांदा आग

भीषण अपघाताचा थरार; भरधाव बस उलटली, 7 जणांचा मृत्यू

New Tax Regime: २० लाखांचे उत्पन्न होऊ शकते टॅक्स फ्री; नवीन कर प्रणालीअंतर्गत ही प्रोसेस करा फॉलो

SCROLL FOR NEXT