Yavatmal News संजय राठोड
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडथळा; देशभक्त मुलांनी पुराच्या पाण्यात फडकवला तिरंगा

झरी तालुक्यातील येडशी येथील शालेय विद्यार्थ्यांनी मात्र हा स्वातंत्र्यदिन शाळेत साजरा करता आला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ: आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. मात्र, झरी तालुक्यातील येडशी येथील शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन शाळेत साजरा करता न आल्याने या विद्यार्थ्यांनी अर्ध्या रस्त्यावर तिंरगा फडकवल्याचं पहायला मिळालं.

यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal Distric) कालपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच झरी तालुक्यातील मुकुटबन पासून सहा किमी अंतरावरील येडशी येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाल्याला आलेल्या पुरामुळे शाळेत जाता आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांनी ओढ्यावर झेंडा फडकवला आहे.

येडशी येथील ८० ते ९० लहान मोठे विद्यार्थी मुकुटबन येथे शिक्षणासाठी जातात. मात्र, येडशी येथील ओढ्याला पुर आल्याने रस्ता बंद झाला परिणामी नाईलाजाने विध्यार्थ्यांनी ओढ्यावरच झेंडा फडकवून राष्ट्रगीत घेऊन नाल्यावरच या वर्षीच्या स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा केला. पुराच्या पाण्यात विद्यार्थ्यांनी जय हिंद, वंदे मातरम् या नाऱ्याने ओढ्याशेजारचा परिसर दुमदुमला विद्यार्थ्यांनी केलेल्या या अनोख्या झेंडावदनामुळे त्यांच्या देशप्रेमाची अनुभूती आली आहे.

मात्र दुसरीकडे, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून झरी तालुक्यातील आदिवसी बहूल येडशी हे गाव आजही मागे आहे. येडशीला जायचे म्हटले की दोन ठिकाणी मोठं मोठाले खड्डे पडले आहेत.

मुलांना ऑटो मध्ये जायचे म्हटले तरी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.गावामध्ये बसची सुविधा नाही, स्मशानभूमी नाही, बऱ्याच गावात समस्या आहे. हे गाव विकासापासून कोसोदूर आहे. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासनाने प्रयत्नशील असायला हवं अशीच इच्छा या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT