childrens drowned in akola, and buldhana saam tv
महाराष्ट्र

Childrens Drowned In Pit : पावसाचा हाहाकार... मुलं गेली वाहून, ढोरपगावात मृतदेह सापडला, अकाेल्यातील बालकाचा शाेध सुरु

या घटनांमुळे स्थानिक नागरिक धास्तावले हाेते.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने / संजय जाधव

Akola News : अकाेला आणि बुलढाणा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूर आला आहे. काही ठिकाणी नाल्यांमध्ये माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे लहान मुलांच्या जीवावर हे सर्व बेतले आहे. बुलढाण्यातील (buldhana) ढोरपगावात वाहून गेलेल्या एका 14 वर्षाच्या मुलाच्या मृतदेह हाती लागला आहे. तर अकाेल्यात नाल्यात वाहून गेलेल्या दहा वर्षाच्या मुलाचे शाेध कार्य सुरु आहे. (Maharashtra News)

अकोला (akola) शहरात नाल्याच्या पाण्यात दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली. अकाेला शहरातील खैर महम्मद प्लॉट येथे ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर मुलाचा शाेध घेण्यास प्रारंभ झाला.

या मुलाचे नाव जियान अहमद इक्बाल अहमद असून तो खैर मोहम्मद प्लॉट येथे राहणारा आहे. जियान मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात खेळत असताना चप्पल नाल्यामध्ये पडला. चप्पल काढत असताना तोल गेल्याने जियान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध सुरु आहे.

ढोरपगावातील बालकाचा मृतदेह सापडला

बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारनंतर अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला. खामगाव (khamgaon) तालुक्यातील ढोरपगाव येथील ओढ्याला आलेल्या पुरात जय विठ्ठल तायडे हा चौदा वर्षाचा बालक ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. आज (गुरुवार) सकाळी त्याचा मृतदेह झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : एखाद्याचं हृदय जिंकायचंय? वाचा चाणक्यांची ही 4 गुपितं

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT