Amravati Rain Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Rain: अमरावतीत मुसळधार पावसाचा कहर! नाल्याला पूर आल्याने १४ वर्षीय मुलगा गेला वाहून, वीज पडून दोन महिलाही जखमी

Child Swept Away Due To Heavy Rain In Amravati: अमरावती जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काल एक चिमुकला वाहून गेला, तर दोन महिला वीज पडल्याने जखमी झाल्याची घटना सांगितली आहे.

Rohini Gudaghe

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

अमरावती जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी दाणादाण उडाली होती. तर दोन मोठ्या दुर्घटना देखील पावसामुळे अमरावती जिल्ह्यात घडल्याचं समोर (Amravati Rain) आलंय. मुसळधार पावसामुळे एक १४ वर्षीय बालक वाहून गेला, तर दोन महिला वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.

कशा घडल्या दुर्घटना?

अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने शहरातील लाल खडी भागातील अंबा नाल्याला पूर आला. त्यामुळे एक १४ वर्षीय बालक अंबा नाल्याच्या पुरात वाहून गेलाय. दुसरी घटना धामणगाव तालुक्यातून समोर (Amravati News) आलीय. तेथे वीज कोसळल्याने दोन महिला जखमी झाल्यात. तर राजापेठ परिसरात एका चार मजली इमारतीवर वीज कोसळल्याने इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचं समोर आलंय.

अमरावतीत मुसळधार पाऊस

अमरावती शहरात सर्वात मोठा अंबा नाला आहे. विविध परिसरातून हा नाला वाहत असतो. याच नाल्यामध्ये लाल खडी कब्रस्तान जवळील १४ वर्षीय परवेज खान अफरोज खान हा बालक मित्रांसोबत खेळत (Rain Update) होता. तेव्हा पाण्याचा अचानक लोंढा वाढल्याने हा बालक नाल्यामध्ये वाहून गेलाय. त्यामुळे लाल खडी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दोन महिलांवर वीज कोसळली

परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतलीय या घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल (Heavy Rain) झाले. या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. या बालकाचा काल उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता तर धामणगाव तालुक्यात शेतीचे काम करून परत जाणाऱ्या दोन महिलांवर वीज कोसळली. त्यामुळे या महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या विजयी सभेआधी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये झळकले बॅनरस

Most Dangerous River: भारतातील सर्वात धोकादायक नदी कोणती माहित आहे का?

Shahapur : मित्रांसोबत फिरायला गेला तो परतलाच नाही; भारंगी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Upvas Medu Vada: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा, फक्त १० मिनिटांत घरी तयार

Makeup Hacks: मेकअप केल्यावर चेहरा काळा पडतो का? मग 'या' चुका करणं टाळा नाहीतर होईल स्किन इन्फेक्शन

SCROLL FOR NEXT