accident, child , beed , mukundraj ghat saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : मुकुंदराज घाटातील अपघातात अकरा वर्षाचा मुलगा ठार

जखमींवर स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विनोद जिरे

Mukundraj Ghat : बीड जिल्ह्यातील मुकुंदराज घाटात ऊसतोड कामगारांचा टॅक्टरला अपघात (accident) झाला. या अपघातात एक अकरा वर्षाचा मुलाचा जागेवर मृत्यू झाला आहे. या अपघातामधील जखमींना (injured) रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या टॅक्टरला मुकुंदराज घाटात अपघात झाला. ट्रॅक्टरचा रॉड तुटल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात एका कामगाराच्या 11 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आठ ते दहा जणांना किरकोळ मार लागला आहे.

हा अपघात बीडच्या अंबाजोगाई शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येल्डा ते मुकुंदराज घाटाच्यामध्ये झाला आहे. रणजित अमोल कांबळे (येल्डा) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रशासनाने तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT