Beed News  Saam TV
महाराष्ट्र

Beed: दोन वर्षांनी भरली यात्रा...; रथ ओढताना 14 वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू

बीडच्या जरूड गावातील धक्कादायक घटना...

विनोद जिरे

बीड: कोरोनाच्या (Corona) 2 वर्षानंतर भरलेल्या यात्रेत, देवाचा पारंपारिक रथ ओढताना, 14 वर्षीय चिमुरडा रथाच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाला आहे. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीडच्या (Beed District) जरूड गावात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परमेश्वर नागनाथ बरडे वय 14 रा. जरूड असं मृत मुलाचे नाव आहे. बीडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जरूड गावात, प्रतिवर्षी जागृत देवस्थान असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील गावातून हजारो भाविक भक्त यात्रेसाठी येत असतात.

मात्र गत दोन वर्षापासून कोरोनाने यात्रा उत्सवावर बंदी असल्याने यात्रा भरली नाही. तर यंदा सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती. यावेळी परंपरेने भैरवनाथाचा रथ ओढला जातो. यंदा देखील हा रथ ओढत असतांना प्रचंड गर्दी झाली होती. लहान लहान मुलांसह वृद्ध देखील रथ ओढत होते. याचवेळी परमेश्वर बरडे हा मुलगा रथ ओढत असतांना खाली पडला अन त्याच्या अंगावरून रथाचे चाक गेले. यातच त्याचा जाग्यावर मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेने भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

SCROLL FOR NEXT