CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde : लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांपासून सावध राहा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

CM Shinde: सांगली येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना सुनावले.

Bharat Jadhav

विनोद पाटील, साम प्रतिनिधी

लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध राहा. कारण विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. हे पाप का करताय? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री शिंदे सांगलीतील विटा येथील टेंभू योजनेच्या ६व्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी एका शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी काम करण्याच्या शैलीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आमच्या सरकारने वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा योजना करणारे आमचे पाहिले सरकार आहे. कारण आम्ही गरिबी पहिली आहे. कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी योजना सुरू केली. घरात बसून कामे होत नाहीत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील आपल्या शेतावर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात त्यावरूनही शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं. हेलिकॉप्टरने शेतीला जातो, अशी माझ्यावर टीका केली जाते, पण मला वेळेचे बंधन आहे. मी १ तासात १० हजार सह्या करतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवरून हल्लाबोल

राज्य सरकारची लाडकी बहिणी योजना खूप लोकप्रिय ठरलीय. या योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी नेहमी आमनेसामने आलेत. महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये सरकार जमा करत असते, मात्र ही योजना फसवी असून फक्त निवडणुकांसाठी रावबण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून सावध राहा. कारण विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. हे पाप का करताय, असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT