Eknath Shinde on Anna Bhau Sathe jayanti  saam tv
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींनी उजाळा दिला.

अभिजीत सोनावणे

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वा जयंती महोत्सव कार्यक्रम चेंबूर येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त (Annabhau Sathe Jayanti) अभिवादन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ सक्षम करण्याचं काम सरकार करणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याला साजेसं स्मारक उभारण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर काम करेल. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्राकडे (central government) शिफारस करू, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिले.

चेंबूर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिंदे म्हणाले, मातंग समाज दिलेला शब्द फिरवत नाही,हा अनुभव मला ठाण्यात आलाय. आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मधली अडीच वर्षे सोडा,आता खऱ्या युतीचं सरकार आलंय. जे थांबलय ते पुढे नेऊ. नरेंद्र मोदींचंही आपल्याला सहकार्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं,यासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

SCROLL FOR NEXT