Cm Shinde on Jarange saam Tv
महाराष्ट्र

Cm Shinde On Jarange: मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार, पण...

Cm Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ जालन्यातील उपषोणस्थळी जाणार आहेत. परंतु या शिष्टमंडळात मुख्यमंत्री जाणार किंवा नाही याबाबत मात्र संभ्रम आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CM Shinde Press Conference:

मागील १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणांसाठी उपोषण करत आहेत. सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटलांनी अटींवर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी यावं, अशी त्यांनी अट घातली होती. (Latest News on Politics)

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ जालन्यातील उपषोणस्थळी जात त्यांची मनधरणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री जाणार किंवा नाही याबाबत मात्र संभ्रम आहे. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्याबरोबर संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही जालन्यात यावं, अशीही अट जरांगे पाटलांनी ठेवली होती.

यावर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार की नाही यांचा खुलासा केला. मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा सुरू आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे जाणार आहे. काल मी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक होती. त्यांनी सरकारची भूमिका, तांत्रिक बाबी त्यांनी समजून घेतल्या. आधी शिष्टमंडळ जाणार त्यांच्या भेटीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लागलीच भेटीसाठी जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

या परिषदेत त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपवरूनही त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच खोट्या प्रचाराला मराठा समाजाने बळी पडून असंही आवाहन केलं. काही लोकांनी खोडसाळपणाने व्हिडिओ व्हायरल केला. काही विघ्नसंतोषी लोक मराठा समाजात सरकारविषयी संभ्रम तयार करत आहेत.

परंतु मराठा समाजाने कुठल्याही दुषप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केले. आज आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकी घेण्यात आली. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाल्याचं शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam: शिक्षण क्षेत्रात खळबळ, परीक्षेच्या आदल्या दिवशी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

गॅस सिलिंडर ते LPG कनेक्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं काय काय बदललं?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड सुरू

मोठी बातमी! बड्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; आयोगावर मुख्यमंत्री संतापल्या

Politics : काँग्रेसच्या तीन नेत्यांची आमदारकी जाणार, पक्षातून निलंबित, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT