CM Fadnavis Saamtv
महाराष्ट्र

CM Fadnvis: माझा सगासोयरा अपराधी असला, तरीही त्याला शिक्षा करेन: मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis: अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. आपला कोणी नातेवाईक असला तरी त्याला शिक्षा करू असं फडणवीस म्हणाले.

Bharat Jadhav

प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट माझ्याशी जोडला जातो. गृहमंत्री असल्यानं मलाच जबाबदार धरलं जातं. पण लक्षात घ्या, माझा सगासोयरा जरी अपराधी असला तरी त्याला शिक्षा करायला मी मागेपुढे पाहणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलंय.

राज्यातील अनेक अनुचित घटनांवरून विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला जातो. या मुद्द्यावरून बोलताना गृहमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सणसण उत्तर दिलंय. गृहमंत्री असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट आपल्याशी जोडला जातो. प्रत्येत गोष्टीला आपल्याला जबाबदार धरलं जातं. पण विरोधकांना लक्षात घेतलं पाहिजे की, २०२२-२४ मध्येही जळी, स्थळी आपल्यालाच टार्गेट केलं जात होतं.

पण त्याच्या परिणाम चांगला झाला. जनतेने आम्हाला आधीपेक्षा जास्त बहुमत दिलं, त्यावरून विरोधक काही शिकतं नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावर बोलताना फडणवीसांना विरोधकांना टोला मारला. कोणतीही घटना असली, कुठेही घडली तर काही लोक त्यात माझा सगासोयराच करू टाकतात. ही एक फॅशन झालीय. पण विरोधकांनी प्रत्येक घटना बघा, गृहविभागाने अतिशय कडक कारवाई केली, असल्याचं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, माझा कोणी सगासोयरा अपराधी असला तरी त्याला शिक्षा करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. कारण माझा सगा हा भारताचे संविधान आहे. तर माझे सोयरे ही राज्यातील १३ कोटी जनता आहे. याच्यापलीकडे कोणालाच झुकते माप मिळणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

जो समाजाचा शत्रू असेल, तो सुटणार नाही. कोणावर अन्याय झाला, तर अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू. काँग्रेस नेते नाना पटोले कुंपणच शेत खातंय असं म्हणातात. पण हे कोणतं कुंपण आहे, असा सवाल फडणवीस यांनी पटोले यांना विचारला. हे खुले शेत आहे. कोणीही आमच्या शेतात येऊ शकतं. काही अडचण नाहीये", असा मिश्किल विधान फडणवीसही यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT