Chief Minister Devendra Fadnavis delivers a sharp political response during the Assembly session, indirectly targeting Raj Thackeray. 
महाराष्ट्र

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

CM Fadnavis Slams Raj Thackeray: विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यांच्या 'मिमिक्री आर्टिस्ट' या टिप्पणीमुळे राज्यात नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

  • ‘मिमिक्री आर्टिस्ट’ असा उल्लेख केला.

  • मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या मुद्द्यावरून घमासान.

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारवर हल्लाबोल करणारे आणि सरकारला टीका करणाऱ्यांना भाडे के टट्टू म्हटलं होतं. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला मु्ख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या भाषणावेळी प्रत्युत्तर दिलं.राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना मिमिक्री अर्टिस्ट म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आधी वापरलेल्या 'भाडे के टट्टू' या शब्दावरून टीका झाल्यावर, त्यांनी उपरोधिकपणे तो शब्द मागे घेत त्याला अधिक "सुसंस्कृत" भाषेत 'सुपारीबाज' असे म्हटले. राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्या हिंदी भाषणातील वक्तव्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख 'मिमिक्री आर्टिस्ट' (नक्कल करणारे कलाकार) असा केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, ते (राज ठाकरे) आमचे मित्र आहेत आणि ते राजकारणात असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. पण ते जर मिमिक्री किंवा स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रात गेले असते, तर इतर कोणत्याही स्टँड-अप कॉमेडियनला मार्केट उरले नसते. मिसिंग लिंक प्रकल्पातील पूल आणि बोगद्यांविषयी चुकीच्या बातम्या पसरवून '७,००० कोटी पाण्यात गेले' असे म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली.

विधानसभेत आदल्या दिवशी रात्री ३:३८ वाजेपर्यंत या प्रस्तावावर चर्चा झाली. रोहित पवार, सुरेश धस, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, जयंतराव पाटील यांच्यासह एकूण ३२ सदस्यांनी या कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेत भाग घेतला. आधीच्या भाषणात वापरलेल्या 'भाडे के टट्टू' या शब्दावर विरोधकांनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला हवे होते, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मी अभ्यास करून तो शब्द मागे घेतो आणि त्याऐवजी अधिक सुसंस्कृत शब्द 'भाटक गदर्भ' किंवा सोप्या भाषेत 'सुपारीबाज' वापरतो,असं मु्ख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT