महाराष्ट्र

Dhananjay Munde: सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितल्या बातमी हाती आली आहे. सरपंच देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागिलाय. सरपंच देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. भाजप आमदार आणि इतर विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

सरपंच संतोष देखमुख हत्येचे फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची चार्जशिट पोलिसांनी कोर्टात सादर केलीये. यानंतर समाजमाध्यमातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. आता याप्रकरणी मोठी बातमी हाती आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय. राजीनाम्याबाबत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना देखील बोलवण्यात आलं होतं. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ती, सरकारची प्रतिमा मलीन होताना दिसतेय. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. त्यामुळे आता धनंजन मुंडे राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.

मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने SIT आणि CID ची स्थापना केली. शनिवारी या प्रकरणी सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याच सांगण्यात आलंय. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात येत असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आलेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीड तास चर्चा झाली. याच बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT