Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये ट्रक चोरी आणि २१ लाखांच्या कर्जाच्या तणावामुळे २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

  • ट्रक चोरी आणि कर्जाचा वाढता ताण हे मुख्य कारण

  • आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट आणि सेल्फी मित्रांना पाठवले

  • उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

एखादी वस्तू आपण स्व बळावर घेताना ती खूप कष्टाने घेतो अगदी ती हजारोंची असो किंवा लाखोंची आपण तिला जीवापाड जपतो. मात्र हीच वस्तू नजरेआड झाली तर वाईटही तितकंच वाटतं. अशीच एक घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. एका तरुणाने कर्जावर घेतलेला ट्रक चोरीला गेल्याच्या नैराश्येतून जीवन संपवलं. संदेश दिनकर गवळी (वय २६) असे या मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये संदेशने पोलिसांविरोधात संदेश लिहिला आहे. त्याच्या मृत्यूने गवळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर शहरातील जय भवानीनगरमध्ये ही घटना घडली. संदेश गवळी हा टँकरचा व्यवसाय करत होता. आई, वडील, दोन भाऊ, बहिणीसह तो जय भवानीनगरमध्ये राहत होता. त्याने बँकेतून कर्ज घेऊन ट्रॅक्टर विकत घेतला होता. हा ट्रॅक्टर काही दिवसांपूर्वी चोरीला गेला. याबाबत संदेशने पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली होती. मात्र चोरीला गेलेला ट्रॅक्टर पोलिसांना सापडला नाही.

दुसरीकडे त्या ट्रॅक्टरच्या कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने दीड वर्षापासून संदेश कर्जबाजारी होता. यामुळे तो सतत चिंतेत असायचा . गुरुवारी सायंकाळी कुटुंब एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी घरी त्यांनी विष घेतले. त्यानंतर संदेशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आत्महत्येपूर्वी संदेशने सुसाइड नोट लिहून हसरे सेल्फी काढले. हे फोटो मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवून त्याने विष घेतले. सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले की, "ट्रकचे २१ लाखांचे कर्ज थकले आहे. त्याला कंटाळून मी माझी जीवनयात्रा संपवीत आहे. यासाठी दुसरे कोणीही जबाबदार नाही. शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. तू दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करू शकलो नाही. आई, मला माफ कर" असे लिहून संदेशने आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra News Live Update: कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Vegetable juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या या 4 भाज्यांचे ज्यूस, पोटावरची चरही मेणासारखी वितळेल

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

SCROLL FOR NEXT