Shivaji Maharaj Wagh Nakh  Saam TV
महाराष्ट्र

Wagh Nakh Coming to India : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शिवप्रेमींना कधी आणि कुठे पाहता येतील?

Chhatrapati Shivaji Maharaj News : राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झाले आहेत.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी बाहेर काढला होता ती वाघनखं पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ती आणण्यासाठीचा करार करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी लंडनला रवाना झाले आहेत.

करार झाल्यानंतर येत्या १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे मुंबईत आणली जाणार आहेत. उद्या म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबाबतचा करार होणार आहे. (Latest Marathi News)

वाघनखे लंडनहून भारतात आल्यानंतर पुढील ३ वर्षांसाठी ती महाराष्ट्रात विविध ठिकाणी ठेवली जाणार आहेत. महाराष्ट्रात वाघनखे आल्यानंतर मोठ्या उत्साहात याचा मोठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबई, सातारा, नागपूर, कोल्हापूर, मुंबई त्यानंतर लंडन असा या वाघनखांचा प्रवास असणार आहे.

शिवप्रेमींना वाघनखे कुठे आणि कधी पाहता येणार?

  • १६ नोव्हेंबर - शिवरायांच्या वाघनखांचे मुंबईत आगमन.

  • १७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ - साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखे ठेवली जाणार.

  • १५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ - नागपूर येथील शासकीय संग्रहालयात वाघनखे ठेवली जातील.

  • एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ - वाघनखे कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवणार.

  • नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ - वाघनखे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सर्वांना पाहता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AR Rahman And Saira Banu Divorce: प्रसिद्ध संगीतकाराचा २९ वर्षाचा संसार मोडला; ए आर रेहमाव आणि सायरा बानू यांचा घटस्फोट

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Assembly Election Voting: मतदान सुरू होताच राज्यात अनेक ठिकाणी EVM पडले बंद, नागरिक वैतागले

Raigad News : निवडणुकीच्या दिवशी बिरवाडीमध्ये भानामतीचा प्रकार; चौकात तीन मडके व नारळ रचले

Assembly Election: सोनाली कुलकर्णीने सकाळीच बजावला मतदानाचा हक्क; सेलिब्रिटींकडून हक्क बजावण्याचं आवाहन

SCROLL FOR NEXT