Marathi News
महाराष्ट्र

Jaydeep Apte News: बायको आणि आईला भेटायला आला अन्..., जयदीप आपटे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात? वाचा...

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, ता. ५ सप्टेंबर २०२४

Jaydeep Apte Arrested: २६ ऑगस्ट रोजी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर काल रात्री जयदीप आपटेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याणमध्ये त्याच्या राहत्या घरापासून जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काही दिवसापासून फरार शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणच्या डीसीपींच्या पथकाने ताब्यात घेतले. जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला जयदीप आपटे अखेर राहत्या घरीच सापडल्याची माहिती समोर आली आहे.

जयदीप आपटे आज रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. सचिन गुंजाळ यांनी सचिन आपटे याला अटक करण्यासाठी दोन पथक तयार केले. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकात होतं तर दुसरे पथक आपटे याचा बिल्डिंग समोर तैनात करण्यात आले होते. आपटे इमारतीच्या परिसरात येताच रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला डीसीपी ऑफिस मध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी त्याची चौकशी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केली. नंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

वकिलांनी फेटाळले आरोप

मात्र जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतले नसून त्याने आत्मसमर्पण केल्याचा दावा त्यांचे वकील गणेश सोवनी यांनी केला आहे. जयदीप आपटेंवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत हे तपास यंत्रणेला सांगणे आणि न्यायालयाला सामोरे जाणे यासाठी जयदीप सरेंडर होणार होता हे ठरलं होते. जयदीप काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं ही स्टोरी साफ खोटी आहे. तसेच या प्रकरणात काही जणांनी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गलिच्छ राजकारण केले, असा आरोपही वकिलांनी केला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेला घेऊन सिंधुदुर्गसाठी रवाना झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT