NV Company Boiler Explosion 
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

NV Company Boiler Explosion : छत्रपती संभाजी नगरमधील शेंद्रा एमआयडीसीमधील एका कंपनीत बॉयलरचा मोठा स्फोट झालाय. यात तीन कामगारांचा मृत्यू झालाय.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजी नगरमधील शेंद्रा एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झालाय. येथील रेडीको एन व्ही कंपनीमधील मका साठवून ठेवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू झालाय. तर ७ ते ८ कामगार बॉयलर खाली दबलेले असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. बॉयलरची वेल्डिंग सुरू असतानाच बॉयलरमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे बॉयलर कोसळले , त्याखाली ७ ते ८ कामगार दबल्या गेले आहेत.

स्फोट झाल्यानंतर तेथे युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर त्यात साठवून ठेवलेला मका खाली पडला असून हा मका बाजुला करण्याचे काम सुरू आहे. त्याच खाली कामगार दबले आहेत. (बातमी अपडेट होत आहे)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

SCROLL FOR NEXT