Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'पुढाऱ्यांना गावात नो-एन्ट्री, हात-पाय तोडण्याचीही धमकी; आरक्षणसाठी मराठा बांधव आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar News: महामार्गावर झळकलेले हे बॅनर सध्या सर्वांचेच लक्ष वेधत आहेत

लक्ष्मण सोळुंके

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच तापला असून राज्यभर मराठा बांधवांकडून आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांचा अल्टिमेटम देत सरकारची कोंडी केली असतानाच आता राजकीय नेत्यांनाही गावात प्रवेशास बंदी घालण्यात येत आहे.

संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील राजुर- फुलंब्री नेशनल हायवे वरील कोलते टाकली गावातील आरक्षणाच्या मागणीसाठी लागलेला बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. गावातील तरुणांनी अक्षरशः मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करत आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालत निवडणूक बंदीचा ही निर्णय घेतला आहे.

तसा ठरावही या गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनाही तो पाठवला आहे. इतकेच नव्हेतर नेशनल हायवे 752 वर जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्यांला टाकळी कोलते गावात प्रवेश बंद. प्रवेश केल्यास हात पाय तोडून गळ्यात बांधण्यात येईल, असे बोर्डही लावले आहेत.

दरम्यान, या बोर्डमुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांची चांगलीच पंचायत झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. महामार्गावर झळकलेले हे बॅनर सध्या सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT