Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: शालेय पोषण आहारातील तांदळात आळ्या आणि लेंड्या; पालकांनी व्यक्त केला संताप

School Nutrition: पोषण आहाराचा दहा कट्टे तांदूळ शाळेच्या खोलीत टाकला. यावेळी तेथे असलेल्या सरपंच आणि गावातील काही नागरिकांनी तेथे जाऊन त्या तांदळांची तपासणी केली.

Ruchika Jadhav

Chhatrapati Sambhajinagar:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील पोषण आहाराच्या तांदळात चक्क अळ्या आणि उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात. यामुळे पालकांनी चांगलाच राडा केलाय.

वांगी बुद्रुक येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून त्यात १३३ विद्यार्थी शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे वांगी बुद्रुक शाळेत पोषण घेऊन ठेकेदारांची गाडी आली. त्यांनी पोषण आहाराचा दहा कट्टे तांदूळ शाळेच्या खोलीत टाकला. यावेळी तेथे असलेल्या सरपंच आणि गावातील काही नागरिकांनी तेथे जाऊन त्या तांदळांची तपासणी केली.

तांदळाचाी गोणी फाडल्यावर ते तांदूळ पाहताच उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात चक्क अळ्या आणि उंदरांच्या लेंड्या दिसल्या. उपस्थितांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.

दरम्यान या निकृष्ट आहारामुळे जर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर? विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतलं तर? या सर्वांना जबादार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

निकृष्ट पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

गोंदियामध्येही शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिल्याने कारवाई करण्यात आली होती. पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याने आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील (school) मुख्याध्यापक बी. सी. ठाकरे यांना निलंबीत करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT