Chhatrapati Sambhajinagar News: शेततळ्यामध्ये पडलेल्या एका चिमुकल्यास वाचवायला गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही दुखःद घटना घडली आहे. यामध्ये २३ वर्षीय कपिल किरण त्रिभुवन आणि ८ वर्षाच्या पीयूष विजय जिवडे या दोघांचाही मृत्यू झाला. मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्याच्या बेलगाव शिवारात पीयूष जिवडे हा खेळत असताना जवळ असलेल्या शेततळ्यात पडला. लहान मुलगा पडल्याचे लक्षात येताच कपिल त्रिभुवनने चिमुकल्याला वाचवण्यासाठी धाडसाने शेततळ्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडला. या दुर्देवी घटनेत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही मृतदेह काढण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत मृत्यू झालेला कपिल त्रिभुवन हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो कोपरगाव येथील संजीवनी महाविद्यालयात अभियांत्रिकीमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येलदरी धरणात बुडून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला...
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी येलदरा धरणात बुडालेल्या १६ वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. येलदरी जलशयात वडील संजय कल्याणकर व मुलगा रोहन कल्याणकर (वय 16 वर्ष) हे दोघं पाण्यात पोहत होते. यावेळी मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो जलयशयाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. अखेर दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे. (Parabhani News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.