Gangapur News:  Saamtvnews
महाराष्ट्र

Gangapur News: टोमॅटो चोरीमुळे वैतागला... शेतकऱ्याने लढवली अशी शक्कल; आता संपूर्ण शिवार CCTVच्या कक्षेत

Farmer Installed CCTV In Tomato Farm: टोमॅटोचे भाव वाढल्याने चोरट्यांनी आता टोमॅटो चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News: संपूर्ण देशात सध्या टोमॅटोचे दर (Tomato Price) प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे.

धक्कादायक म्हणजे टोमॅटोचे भाव वाढल्याने चोरट्यांनी आता टोमॅटो चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच आपल्या शेतातील टोमॅटो चोरीला वैतागलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या पिकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर (Gangapur) तालुक्यातील लासुर परिसरात, आसेगाव, शहापूर बंजर, आंबेगाव, खोजेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. शहापूर बंजर येथील शेतकरी शरद लक्ष्मण रावते यांना अडीच एकर शेती असून अनेक वर्षांपासून ते त्यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेतात.

यावर्षी रावते यांनी जून महिन्यात दीड एकर शेतात टोमॅटोची लागवड केली आहे. रोप लागवड, औषध फवारणी, बांधणी, मजुरी असा आतापर्यंत एकूण ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च त्यांनी टोमॅटो लागवडीवर केला आहे. आठ- दहा दिवसात त्यांच्या शेतातील टोमॅटो तोडणीला येणार आहेत.

मात्र, या टोमॅटोवर चोरट्यांची नजर पडली. रात्रीच्या वेळी कोणीतरी त्यांच्या शेतातून कच्चे टोमॅटो चोरून घेऊन जात असल्याचं आढळून आले. त्यामुळे वैतागलेल्या रावते यांनी नुकतेच टोमॅटो चोरी रोखण्यासाठी पिकाच्या मधोमध २० ते २२ हजार रुपये खर्च करून उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सायरन तसेच ऑडियो व्हाईसची सुविधा असून हा सीसीटीव्ही कॅमेरा मोबाईलवरून ऑपरेट करता येतो. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT