murder accused attac on police in court
murder accused attac on police in court saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: तंबाखू, सिगारेटसाठी खुनातील आरोपींचा न्यायालयातच पोलिसांवर हल्ला! वॉरंटही फाडले

डाॅ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये खुनाच्या आरोपींनी पोलिसांवर हल्ला करून वॉरंट फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर एका आरोपीने भिंतीवर डोकं आपटून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या घनटेने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील जिल्हा न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी हा राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये तंबाखू, सिगारेट घेऊन जाण्यास पोलिसांनी विरोध केल्याने या आरोपींनी न्यायालय परिसरातच पोलिसांवर हल्ला चढविला.

धक्कादायक बाब म्हणजे याच आरोपींने एका पोलिसाला चावा घेत वॉरंटदेखील फाडून टाकले. हा धिंगाणा एवढ्यावरच थांबला नाही. तर एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. (Latest Political News)

जिल्हा न्यायालयात झालेल्या या धिंगाणा प्रकरणात शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल युवराज पवार, गणेश रवींद्र तनपुरे व ऋषिकेश रवींद्र तनपुरे अशी आरोपींची नावे आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil: सहानुभूतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

SCROLL FOR NEXT