Maratha Reservation Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'माझ्या लेकराला अन् समाजाला आरक्षण द्या', भावनिक चिठ्ठी लिहित मराठा तरुणाने संपवलं आयुष्य

Maratha Reservation Latest News: राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे आरक्षणासाठी लढा उभारलेला असताना मराठा बांधव आत्महत्या करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडमध्येही मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

Gangappa Pujari

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर| ता. ४ जुलै २०२४

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४० वर्षीय कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी भागात एका ४० वर्षीय कामगाराने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. सोपान दशरथ सातपुते असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सरकार समाजाला खेळवत असून माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या असा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी देखील त्याच्याकडे आढळून आली.

याशिवाय जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? असंही त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. सोपान हे रांजणगाव भागात एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते घरी कोणी नसताना त्यांनी ही आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे आरक्षणासाठी लढा उभारलेला असताना मराठा बांधव आत्महत्या करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडमध्येही मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT