राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर| ता. २१ जुलै २०२४
शेतामध्ये औषध मारताना विषबाधा होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यामध्ये घडली होती. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली असून किटकनाशके फवारताना १२ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमध्ये मका पिकाच्या पोंग्यामध्ये कीटकनाशक औषध टाकताना त्यातून 12 मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून यामधील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
सोयगाव तालुक्यात काही दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने मका पीक चांगलेच बहरले आहे. या पिकाला किडीचा प्रादुर्भाव होऊ नये शिवाय मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी मक्याच्या पोंग्यात कीडनाशक द्रव टाकण्यात व्यस्त आहेत.
मात्र हे द्रव टाकत असतानाच काही मजुरांना घाम आला तर काहीना चक्कर आल्याने त्यांना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता हा विषबाधा झाल्याचा सगळा प्रकार समोर आला आहे. या सर्व मजुरांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.