राज्यात कुपोषित मुलांची संख्या सर्वाधिक Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका; छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ५०३ बालके तीव्र कुपोषित

Malnourished Children: महिला बालकल्याण विभागाच्या तपासणीतून ही बाब समोर आली असून अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनामुळे लहान बालकांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ७ एप्रिल २०२४

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या हजार 503 बालके तीव्र, तर 5149 बालके मध्यम कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला बालकल्याण विभागाच्या तपासणीतून ही बाब समोर आली असून अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनामुळे लहान बालकांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. मात्र त्या संपाचे परिणाम जिल्ह्यातील लहान बालकावर झाल्याचे आता समोर आले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने संभाजीनगर जिल्ह्यात 2 हजार 883 अंगणवाडी केंद्राच्या केलेल्या तपासणीत जिल्ह्यात 1 हजार 503 बालके तीव्र कुपोषित, तर 5हजार 149 बालके मध्यम कुपोषित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बालकांपर्यंत पोषण आहार व प्राथमिक उपचार पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा वर्कर यांच्या संप काळातील ही आकडेवारी महिला आणि बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या संप काळातील अनुपस्थिती मध्येच जिल्ह्यातील कुपोषित बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय गर्भवती महिलांची माहिती ही सर्वच कामे त्यावेळी बंद असल्याने त्याचा विपरीत परिणाम जन्मलेल्या बालकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT