Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: तरुण शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! पाणी चोरांवर नजर ठेवण्यासाठी चक्क शेतातच लावले CCTV कॅमेरेआयडिया

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

सध्या राज्यात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासाठी सर्वांचीच वणवण होत आहे. या स्थितीमध्ये पाणी चोरीची देखील मोठी शक्यता आहे. म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी चोरीला जाऊ नये म्हणून म्हणून शेतकऱ्याने भन्नाट आयडिया केली आहे. नेमकं त्याने काय केलंय, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. हा तरूण शेतकरी कोण आहे ? ते पाहू या.

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील (Chhatrapati Sambhajinagar News) या तरूण शेतकऱ्याने पाण्याचं राखण करण्याकरिता शेतात चक्क ३६० डिग्री कॅमेरा बसवला आहे. पाणी आणि मिरचे राखण करण्यासाठी त्याने ही भन्नाट आयडिया वापरली आहे. या तरूण शेतकऱ्याचं नाव रामेश्वर गव्हाणे असल्याची माहिती मिळत आहे. मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यानी पाण्याची काटकसर करत मिरची विकायला सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात तरूण शेतकऱ्यानी भन्नाट आयडिया केली आहे. मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे (Farmer Success Story) आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये. आलेल्या मिरचीचे जंगली प्राणी नुकसान करू नये म्हणून या शेतकऱ्याने आपल्या शेतावर ३६० डिग्रीचा कॅमेरा लावला (Water Issue) आहे. यामुळे आता पाणी चोरांवर कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

भीषण पाणीटंचाईचा सामना करत या तरूणाने (Prevent Water Theft) कडक उन्हाळ्यात मिरचीचं पीक घेतलं आहे. त्याने पाण्याचं योग्य नियोजन केलंय. अडीच एकर क्षेत्रात त्याने मिरचीचं यशस्वी पीक उभं केलं आहे. आता त्याने मिरची विकायला सुरूवात केल्याची माहिती मिळत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा तरूण शेतकरी चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT