Daulatabad Devagiri Fort Fire Saam Tv News
महाराष्ट्र

Devgiri Fort Fire : दूरवर धुराचे लोट, उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळाले; दौलताबादच्या किल्ल्याला भीषण आग

Daulatabad Devgiri Fort Fire Breaks : ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते. त्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळी आग लागली. बघता बघता ही आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली.

Prashant Patil

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आणि जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या आगीची व्याप्ती वाढून अग्नितांडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला आहे.

यादरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे जीवाणू प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदि प्राणी सौरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या.

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते. त्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळी आग लागली. बघता बघता ही आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली. ऐतिहासिक वारशाला मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती खराब होत अशून कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता असल्याचं मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला आग लागली तेव्हा सुकलेले गवताने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. आग विझवण्याचे कोणतेही साधन नसताना त्या ठिकाणी असलेल्या हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु केले. सुकलेल्या गवताने आणि जोरात वाहानाऱ्या वाऱ्यामुळे डोंगरावरील आगिने रुद्ररूप धारण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT