WALUJ MURDER CASE: YOUTH KILLED OVER LIQUOR DELAY, THREE ACCUSED ARRESTED Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : भयंकर! दारू आणण्यासाठी उशीर झाला, मित्रांनी तरुणाला जागीच संपवलं; पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Sambhajinagar Waluj Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात दारू आणण्यासाठी उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

Alisha Khedekar

  • वाळूज परिसरात दारूच्या वादातून तरुणाची हत्या

  • मृत ओमकार सूर्यवंशी हा नांदेडमधील मासेविक्रेता होता

  • सीसीटीव्ही आणि सोशल मीडिया रीलमुळे आरोपींचा शोध लागला

  • पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने तीन आरोपींना अटक

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Omkar Suryawanshi Murder Case छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू आणण्यासाठी उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ओमकार चंद्रकांत सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील रामनगर सांगवी परिसरातील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार हा मासे विक्रेता होता. १८ मे रोजी लवकी गावाजवळील (Lavki Village Murder) शेतात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृतदेह ओमकार सूर्यवंशी याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित दुचाकीचा माग काढत पोलिसांनी शोरूममधून मागील चार वर्षांचा डेटा गोळा केला.

त्याचवेळी सोशल मीडियावर “टपका रे टपका” या गाण्यावर तयार केलेली एक रील सायबर पोलिसांच्या हाती लागली. या रीलमधील चेहरे आणि सीसीटीव्हीतील संशयितांची ओळख जुळल्यानंतर आरोपी नांदेडमधील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस कर्मचारी बाबासाहेब काकडे आणि सूरज अग्रवाल यांनी भाजीपाला विक्रेत्याचा वेश धारण करून नांदेडमधील गुन्हेगारी वस्तीत सलग तीन दिवस पाळत ठेवली. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी परराज्यात फरार झाले होते. मात्र ते परत आपल्या राहत्या घरी येताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

या प्रकरणात रवी देविदास दुधमल (१९), सय्यद हाशिम सय्यद हसन (१८) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस तपासात ही हत्या दारू उशिरा आणल्याच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, संजय जगताप आणि विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT