Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भरदिवसा एका व्यक्तीच्या घरात दोन अज्ञातांनी घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील पुंडलिक नगर परिसरामध्ये घडली आहे.

ज्या व्यक्तीच्या घरात गोळीबार झाला ती व्यक्ती मनपा स्वच्छता कर्मचारी आहे. या अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पीडित व्यक्तीने समय सूचकता दाखवत मान बाजूला केली, म्हणून त्यांचे थोडक्यात प्राण वाचले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोळीबार केल्यानंतर या दोन्ही अज्ञात व्यक्तींनी पळ काढला आहे. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात आरोपी दिसत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शेतीच्या वादातून तुफान राडा, तलवारीने हल्ला करत गोळीबार

दरम्यान, गुरुवारी नंदुरबारमध्ये (Nandurbar) शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये झालेल्या तुफान राड्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्याचसोबत तलवारीने वार देखील करण्यात आले होते. (Latest Marathi News)

या घटनेमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहादा पोलिसांकडून (Shahada Police) या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT