Madhya Pradesh Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : 'हमारे साथ चलो, नहीं तो काट देंगे'; तिला रिक्षात कोंबलं अन, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं

Kidnapping News : तरुणी रस्त्याने जात असताना अचानक टवाळ मुलांच्या टोळक्याने तिची वाट अडवली.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अशात काल एका तरुणीचे अपहरण झाल्याची घटना समोर आलीये. भर रस्त्यात या तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे. तरुणी रस्त्याने जात असताना अचानक टवाळ मुलांच्या टोळक्याने तिची वाट अडवली. तरुणीला रिक्षात बसण्यास सांगितले. (Kidnapping News)

कापून टाकण्याची धमकी

सदर घटना घडली तेव्हा रस्ता गजबजलेला होता. मात्र या टोळक्याने मोठी दहशत पसरवली. त्यामुळे इतर व्यक्ती देखील भयभीत झाल्या.

एका स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासोबत सिम कार्ड खरेदीसाठी तरुणी निघाली होती. त्यावेळी सहा ते सात टवाळखोरांनी बळजबरीने तिला रिक्षात कोंबून अपहरण केले आहे. हमारे साथ चलो नही तो काट देंगे अशी धमकी देत त्यांनी भर रस्त्यावर दहशत निर्माण केली. हा सगळा प्रकार शहरातील मोंढा नाका परिसरात उघडकीस आलाय.

एकास अटक

याप्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच बीबी का मकबरा परिसरात मित्रासोबत बोलणाऱ्या तरुणीला मारहाण करत छेड काढल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. तसेच शहरात नेमके चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT