Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News saam tv
महाराष्ट्र

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या बापानेच दोन मुलांना विहिरीत फेकले, एकाचा बुडून मृत्यू

माधव सावरगावे, औरंगाबाद

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून या पित्याने विहिरीत फेकलेल्या एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे, तर एचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागात किरकोळ कौटुंबिक वादातून जन्मदात्याने बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकले. यात एका मुलाला वाचवण्यात यश तर लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय.

शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून नशेत असलेल्या पित्याने पोटच्या मुलांनाच विहिरीत फेकल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.

या घटनेत मोठ्या मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र 7 वर्षांच्या चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाला. राजू प्रकाश भोसले (३५) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

या घटनेत नऊ वर्षांचा शिवम बचावला असून त्याचा लहान भाऊ श्रेयसचा (७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरोपी राजू भोसले याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Tips: अख्खी रात्र पंखा वेगानं चालू ठेवून झोपणे अंगाशी येईल; दुष्परिणाम भयंकर

Pune News: धक्कादायक! फी न भरल्याने हजारो विद्यार्थ्यांचा निकाल रखडला; पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार

Nira Dam Water : लोकसभा निवडणुकीत नीरेचा पाणीप्रश्न पेटला!; पंढरपूरच्या 9 गावांतील शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा

Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT