Uttam Dhoke Chhatrapati Sambhajinagar Crime News  Saam TV
महाराष्ट्र

BJP Leader Arrested : महाराष्ट्र हादरला! भाजप शहराध्यक्षला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Phulambri clinic alleged sexual assault case latest news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये ४५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Uttam Dhoke Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील समर्थ क्लिनिकमध्ये घडलेला एक अत्यंत संतापजनक आणि धक्कदायक प्रकार समोर आला आहे. क्लिनिकचा संचालक डॉ. रामदास महादू तरटे याने गुंगीचे औषध देऊन एका ४५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तो इतक्यावर थांबला नाही तर महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टरसह भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांनाही अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

फुलंब्री बसस्थानक परिसरातील समर्थ क्लिनिकमध्ये येणाऱ्या महिलांवर डॉक्टर रामदास तरटे हा नजर ठेवून असायचा. उपचारासाठी येणाऱ्या अनेक महिलांचे त्याने अशाच प्रकारे शोषण केल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. पीडित ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी मुख्य आरोपी डॉ. तरटे याला बेड्या ठोकल्या.

भाजप शहराध्यक्ष अटकेत

मुख्य आरोपी डॉ. तरटे याला अटक केल्यानंतर पोलिसांसमोर हा अश्लील व्हिडिओ नक्की कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कोणी प्रसारित केला, असा मोठा प्रश्न होता. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, यात भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम ढोके यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या धक्कदायक घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर परिसरात एकच संताप उसळला असून, क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या इतर महिलांच्या शोषणाबाबतही पोलीस आता कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो रस्त्यावर फटाके फोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार; दिवाळीआधी पोलिसांकडून कडक इशारा

Coconut Laddu Recipe: दिवाळीचा फराळ करायला सुरुवात झाली? मग झटपट बनवा हेल्दी चविष्ट नारळाचे लाडू; वाचा रेसिपी

Exit Poll: पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ?

Peru Chutney : घरच्या घरी ५ मिनिटांत बनवा पेरूची चटपटीत चटणी, जेवणाची वाढवेल चव

Bridal Beauty Kit: नवरीच्या मेकअप किटमध्ये काय असावं? लग्नाच्या दिवशी उपयोगी पडतील या ७ गोष्टी

SCROLL FOR NEXT